कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केलेल्या कोल्हापूर पोलीस दलातील ३ पोलीस अधिकाऱ्यांसह २२ पोलीस अंमलदारांना १ मे रोजी साजरा होणाऱ्या महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस महासंचालक पदक जाहीर जाहीर झाले आहे. त्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

महासंचालक पदक जाहीर झालेल्यांमध्ये – श्रीकृष्ण कटकधोंड पोलीस निरीक्षक (शाहूपुरी), विजय मस्कर पोलीस उपनिरीक्षक (एसपी ऑफीस), पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, सहाय्यक फौजदार काशिनाथ धुळे (पोलीस मुख्यालय), पोलीस हवालदार संजय पडवळ (एलसीबी), उत्तम सडोलीकर (एलसीबी), रफिक आवळकर (एलसीबी), महिला पोलीस हवालदार श्रीमती मिनाक्षी पाटील (अनैतिक मानवी व्यापार), पोलीस हवालदार विजय पाटील (पोलीस मुख्यालय),  शरद पोरे (लाचलुचपत विभाग), विजय निकम (पोलीस मुख्यालय), दिलीप कांबळे (इस्पुर्ली पोलीस ठाणे), प्रकाश संकपाळ (जुना राजवाडा), सतीश चौगुले (महिला कक्ष), हरी पाटील (पोलीस मुख्यालय), लक्ष्मण धायगुडे (विशेष तपास पथक), सचिन लोहार (नियंत्रण कक्ष), सुनील तिबिले (शाहूवाडी विभाग), नानासाहेब थोरात (पोलीस मुख्यालय), भारत कांबळे (महामार्ग सुरक्षा पथक), पोलीस नाईक सतीश कुरणे (बीडीडीएस), विशाल साळोखे (मोटर परिवहन विभाग), अमित सातार्डेकर (करवीर पोलीस ठाणे), पोलीस शिपाई अमृत तिवले (पोलीस मुख्यालय), श्रीमती सोनाली देसाई (पोलीस मुख्यालय) हे आहेत.