कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज (गुरुवार) पोलीस अधिक्षक कार्यालयासह विशेष पोलीस महानिरीक्षक आणि शहर डीवायएसपी कार्यालयाला भेट देवून विविध कामकाजांचा आढावा घेतला.

वार्षिक निरीक्षणाचा भाग म्हणून वरिष्ठ अधिकारी वार्षिक तपासणी घेत असतात. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देऊन मंत्रालयीन शाखा, गुन्हे, सायबर, आर्थिक गुन्हे, जिल्हा विशेष इतर शाखेच्या कामकाजांचा आढावा घेतला.

या भेटीनंतर तपासणीचा एक भाग म्हणून पोलीस महासंचालकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभागाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर आणि शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांकडून गुन्ह्यांचा तसेच कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी विशेष पोलीस महा निरीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र कार्यालयाला भेट दिली.