कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके यांना सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अर्थ, कृषी, बँकिंग, सहकार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उडान – डेअर टू ड्रीम या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थित त्यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

विश्‍वास पाटील म्‍हणाले की संचालक चेतन नरके हे विविध संस्थेशी निगडीत आहेत. त्यांनी अल्पावधीतच सहकार, दुग्धव्यवसाय, कृषी, समाजकारण आणि राजकारणात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांनी या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

चेतन नरके म्‍हणाले की, हा पुरस्‍कार म्‍हणजेच माझी सहकार क्षेत्रात  केलेल्‍या कामाची पोच पावती आहे. बाहेरील देशात केलेल्‍या कामापेक्षा सध्या करत असलेल्‍या सहकार क्षेत्रातील कामामध्‍ये समाधानी आहे.

याप्रसंगी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील आदीसह अधिकारी उपस्थित होते.