सावरवाडी (प्रतिनिधी) :  करवीर तालुका पश्चिम भागातील कोगे येथील नवीन रस्त्यावरील एल आकाराचे वळण आहे. या वळणावर अनेक छोटे-मोठे अपघात घडत होते. याबाबत लाईव्ह मराठीने प्रसिध्दीकेलेल्या वृत्ताची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन रस्त्यावर दिशादर्शक फलक लावले.

कोगे ते कोल्हापूर मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर नेहमी लहान-मोठे अपघात घडतात. दिशादर्शक फलकामुळे वाहनधारकांची सोय झाली आहे.

करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, ’लाईव्ह मराठी’च्या वृत्ताची तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन तत्परतेने या वळणाच्या दोन्ही बाजूस दिशादर्शक फलक लावले. जवळपास ५० फूट कॅरी डोअर, अपघाती वळण अशा पद्धतीचे फलक लावल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.