महापालिकेत थेट अँब्युलन्स आणि..!

0
93

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर महापालिकेच्या प्रागंणात आज दुपारी चक्क थेट सायरन वाजत अँब्युलन्स आली अन् एकच खळबळ उडाली. काही वेळानंतर समजले की महापालिकेचीचं अँब्युलन्स एका सफाई कामगारांने आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यासाठी आणली आहे.

कोल्हापूरीतील प्रभाग क्र.३६ मध्ये २१ जानेवारी रोजी दुपारी महापालिकेची सफाई करताना या कामगाराला ह्दयविकाराचा झटका आला होता. मात्र, महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी साधी विचारपूस केली नसल्याचा आरोप त्याने केला. आज महापालिकेचा सफाई कामगार सुनिल आवळे यांनी चक्क अँब्युलन्समधून येवून अनोखं आंदोलन केलं. त्यामुळे सुमारे अर्धा तास महापालिकेत वातावरण तापले होतं. यावेळी मी कामावर असताना मला अॅटॅक आला होता. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्यांनी साधी विचारपूस केली नसल्याचा आरोप सुनील आवळे यांनी केला.

तर प्रशासकीय सेवेत कायम करून घेण्यात यावे आणि झालेल्या प्रकाराबद्दल नुकसान भरपाई मिळावी. तसेच डॉक्टरांनी काम न करण्यास सांगितल्यामुळे आपल्या मुलाला प्रशासकीय सेवेत घ्यावे. अशा मागण्या त्यानी केल्या. याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी आवळे यांची समजूत काढून महापालिकेच्या नियमानुसार आपल्या मागण्यांची पूर्तता होईल. असं लेखी आश्वासन दिल्यानंतर आवळे यांनी आंदोलन थांबवलं. आवळे यांनी महापालिकेचीचं अँब्युलन्स आणून आंदोलन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.