सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या महादेव मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

बाराव्या शतकात बांधण्यात आलेल्या या मंदिराची ख्याती पंचक्रोशीत आहे. गावातील युवकांच्या प्रयत्नातून मंदिर परिसरात पंधराशे दिव्यांची आरास करण्यात आली होती. मंदिर परिसर दिव्यांमुळे प्रकाशमय झाला होता. रांगोळीच्या माध्यमातून कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यात आली. अप्रतिम रांगोळी आणि दिव्यांमुळे संपूर्ण मंदिर उजळून गेले  होते. मंदिर परिसरात युवकांनी मास्कचा वापर करून सामाजिक अंतराचे नियम पाळून दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन सोहळा, भजन, आरती यासह धार्मिक कार्यक्रम पार पडले. या वेळी गावातील आबालवृद्ध भाविक उपस्थित होते.