‘होय, पक्षात जाणीवपूर्वक तडजोडी केल्या…’ : शरद पवार

0 86

मुंबई (प्रतिनिधी)  :  सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजप-शिवसेना युती सरकारला कोणत्याही परिस्थितीत खाली खेचण्यासाठी अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक तडजोडी केल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. ते आज (बुधवार) जळगाव येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.  

पुढे ते म्हणाले की, उमेदवारी देण्यापासूनच राष्ट्रवादीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. एबी फॉर्म देण्यावरूनही गडबड झाली. तर पैठणमध्ये एकाचवेळी दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते. एवढच काय तर पुणे जिल्ह्यातील दोन मतदार संघात राष्ट्रवादीने उमेदवारांना एबी फॉर्मच दिले नाहीत. काँग्रेसला देखील ते मतदार संघ देण्याची भूमिका घेतली नाही. त्यामुळे निवडणूक न लढवता राष्ट्रवादीला काय साधायचा होतं, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात येत होता.

पवारांनी पुढे सांगितले की, या व्यतिरिक्त खुद्द अजित पवारांनी सोलापूरमधील करमाळा आणि सांगोला येथील राष्ट्रवादीच्याच उमेदवारांविरुद्ध भूमिका घेतली. या दोघांना राष्ट्रवादीने खुद्द उमेदवारी जाहीर केली होती. एकूणच या घडामोडींवरून राष्ट्रवादीत सावळा गोंधळ सुरू असल्याची चर्चा होती, मात्र या तडजोडी कूटनीतीचा भाग असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पवारांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More