हरपवडेच्या सरपंच पदी दिनकर चौगले तर उपसरपंच पदी अनिल मोहिते बिनविरोध…

0
426

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील हरपवडेच्या सरपंच पदी दिनकर चौगले तर उपसरपंच पदी अनिल मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून बुराण यांनी काम पाहिले. या निवडीनंतर सरपंच आणि उपसरपंच यांचा ग्रामसेवक अवधूत पाटील यांनी सत्कार केला.

यावेळी सदस्या वैशाली पाटील, वैशाली चौगले, सुवर्णा चौगले, राणी सुर्यवंशी, गोविंदा चौगले, शिवाजी पाटील, संभाजी चौगले, कृष्णात मेंगाने, ग्रामस्थ उपस्थित होते.