दिंडनेर्ली ग्रा.पं., संभाजी ब्रिगेडचा मुर्तीदानाचा स्त्युत्य उपक्रम…

0
192

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली ग्रामपंचायत आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त उपक्रमाने गेली पाच वर्षे गणेश मुर्तिदान आणि निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. यावर्षीही या उपक्रमाला ग्रामस्थांकडून उस्त्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दिंडनेर्लीमध्ये ग्रामपंचायत आणि संभाजी ब्रिगेडतर्फे ग्रामस्थांना गौरी गणपतींचे दान करावे, असे आवाहन केले होते. याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी चार ठिकाणी ट्रॅक्टर लावून मूर्तीदान आणि निर्माल्य दान उपक्रम राबवला. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी उपसरपंच सविता पाटील, ग्रामविकास अधिकरी काकासाहेब पाटील, तानाजी पाटील, बाळासो पाटील, प्रियंका कोईगडे, ग्रा. पं. कर्मचारी अमित नलगे, सौरभ कुंभार, युवराज परीट,  साताप्पा कांबळे, दत्तात्रय शिंदे, गंभीर पाटील, तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.