केडीसीसीच्या कामगार प्रतिनिधी पदी दिलीप लोखंडे, इम्तियाज मुनशी यांची निवड…

0
22

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून दिलीप लोखंडे आणि इम्तियाज मुनशी यांची निवड करण्यात आली. ही निवड बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. या निवडीबद्दल आ. मुश्रीफ यांच्या हस्ते संचालक मंडळाच्यावतीने या दोघांचा सत्कार करण्यात आला.

बँकेमध्ये दोन मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना आहेत. दिलीप लोखंडे हे बँक एम्प्लॉईज युनियनचे प्रतिनिधी आहेत. तर इम्तियाज मुनशी हे कोल्हापूर डिस्ट्रीक्ट बँक एम्प्लॉईज युनियनचे प्रतिनिधी आहेत.

यावेळी उपाध्यक्ष आ. राजूबाबा आवळे, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, माजी खासदार डॉ. निवेदिता माने, ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, आदी उपस्थित होते.