डिजिटल मिडिया आता केंद्र सरकारच्या अखत्यारीत…

0
61

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंटरनेटचे दर जसे स्वस्त झाले तशी देशातल्या डिजिटल मिडीयाला उभारी मिळाली. देशभरात असंख्य यू ट्यूब चॅनेल्स, पोर्टल, न्यूज पोर्टल सुरू झाले. मात्र, यावर सरकारचे नियंत्रण नव्हते. तसेच या मीडियासाठी काही मार्गदर्शक नियमावलीही जारी करण्यात आली नव्हती. मात्र, आता डिजिटल मिडिया आता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत आला आहे. याबाबत आज (बुधवार) केंद्र सरकारने आदेश जारी केलाय.

मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. याबाबत आज आदेश जारी करण्यात आला. या आदेशानुसार आता ऑनलाइन सामग्री प्रदात्यांद्वारे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केलेले चित्रपट, दृकश्राव्य कार्यक्रम, ऑनलाईन बातम्या व चालू घडामोडींवरील माहिती आता माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार आहेत. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी होणार आहे.