मास्क नाही घातला ? : राज ठाकरेंचे सडेतोड उत्तर

0
547

मुंबई (प्रतिनिधी) : बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते,  सरकारच्या कार्यक्रमाला गर्दी होते. सरकारमधील मंत्री सगळ्या कार्यक्रमांमध्ये धुडगूस घालू शकतात, शिवजयंतीला तुम्ही नकार देता. मराठी भाषा दिनाला नकार देता. एवढं कोरोनाचे संकट समोर येतंय, असे वाटत असेल, तर सगळ्या जाहीर केलेल्या निवडणुका पुढे ढकला,  अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) येथे केली.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी एका पत्रकाराने राज यांना तुम्ही मास्क घातलेला नाही, असा प्रश्न केला असता यावर राज यांनी मी घालत पण नाही,  असे उत्तर दिले. तसेच पुढे त्यांनी, मी तुम्हालाही सांगतो, असे म्हणत तिथून निघून गेले.