बाईंच्या डोक्यावर अपघात झालायं का..?: उर्मिला मातोंडकरांचा कंगनाला टोला

0
224

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेसोबत झालेल्या वादानंतर अभिनेत्री कंगना रणौत मंगऴवारी मुंबईत दाखल झाली. यावेळी तिने मुंबईत राहण्यासाठी केवळ बाप्पाच्याच परवानगीची गरज लागते. इतर कुणाच्या परवानगीची गरज नाही, असे म्हणत अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला. यावर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी  कंगनाला खोचक टोला लगावला आहे.

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ,  असा मिश्किल सवाल करत उर्मिला यांनी कंगनाचे नाव न घेता टोला लगावला. माझ्या प्रिय मुंबई शहराच्या पाठी उभे राहण्यासाठी असे म्हणत उर्मिला यांनी बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का भाऊ, असा सवाल केला. उर्मिला यांनी याआधीही कंगनावर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्विटनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर  दोघीमध्ये शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता आहे.