कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणच्या कोल्हापूर ग्रामीण विभाग २ अंतर्गत कागल उपविभागामार्फत औद्योगिक वीजग्राहकांसाठी संवाद मेळाव्याचे आयोजन दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० च्या दरम्यान करण्यात आले आहे.

हा मेळावा गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात  तर दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कागल-हातकणंगले मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सभागृह (पंचतारांकित औद्योगिक वसाहत, रेमंड सर्कल जवळ) येथे करण्यात आले आहे. यामध्ये औद्योगिक वीज ग्राहकांच्या वीज पुरवठा, वीज सुविधा विषयक अडचणी, महावितरणच्या ग्राहक सुविधा आणि सवलत योजनांबाबत या मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे या मेळाव्याचा वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर मंडळाचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी केले आहे.