गुणरत्न सदावर्ते यांच्या निषेधार्थ मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन  

0
31

कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासदार छत्रपती संभाजीराजे यांना अटक करण्याचे विधान केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने  आज (मंगळवार) छत्रपती शिवाजी महाराज चौकात  मूक धरणे आंदोलन करण्यात आले.

नांदेड येथे  खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या वतीने  शुक्रवारी ( दि. २०) धरणे आंदोलन  करण्यात आले होते. यावेळी या आंदोलनाला मराठा समाजाकडून  उत्स्फूर्त  सहभाग मिळाला होता.  मराठा समाजाची एकजूट पाहून  गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती संभाजीराजेंना अटक करण्याची मागणी केली होती. याच्या निषेधार्थ आज कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सदावर्ते  यांच्या निषेधार्थ मूक धरणे आंदोलन करण्यात आले  होते.