गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने गारगोटी येथील हुतात्मा क्रांती चौकात भाजपा आणि केंद्र सरकारच्या अन्यायकारक विधेयकाचा निषेधार्थ धरणे आंदोलन केले. तसेच काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्यावर भ्याडासारखे हल्ला करणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळून प्रंचड घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. यावेळी भुदरगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी आंदोलनाची माहिती दिली. यावेळी गारगोटी सरपंच राजू काझी, व्ही. जे.कदम, संजय सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी केंदातील हेकेखोर, अपरिपक्व मोदी सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधी अन्यायकारक विधेयकाचा, काळ्या कायद्याचे धोरण मागे घेण्यासाठी तसेच उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील अत्याचार पिडीत तरुणी मृत्यू झाला. तिच्या आई,वडील व कुटुंबीयांना भेटायला गेलेले राहूल गांधी यांच्यावर भ्याड हल्ला करणारे मुख्यमंत्री योगी यांचे पुतळयांचे दहन चौकात करण्यात आले. तसेच सरकार विरोधी निषेधांच्या घोषणाही देण्यात आल्या. तर मोदी सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधी केलेल्या विधेयकाचा निषेधाचे निवेदन तहसीलदार अमोल कदम यांना देण्यात आले.

यावेळी एस.एम.पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक प्रकाश देसाई, उपसभापती सत्यजितराव जाधव, शेणगांव सरपंच सुरेशराव नाईक, युवक काँग्रेस प्रदेश महासचिव शंभूराजे देसाई, भुजंगराव मगदूम, सुधिर वर्णे, उपसरपंच मोहनराव शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.