…तर धनंजय मुंडेंचा तत्काळ राजीनामा घेतला असता..!

काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादीला घरचा आहेर   

0
444

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता, असे म्हणत माजी खासदार आणि काँग्रेस नेते हुसेन दलवाई  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला  आहे. चिपळूणमध्ये  ते पत्रकारांशी बोलत होते.

धनंजय मुंडे यांच्यावर एका तरूणीने  बलात्काराचा आरोप  केल्याने मुंडे अडचणीत आले आहेत. त्यांच्या  राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यातच काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेणार नाही. हे प्रकरण पोलिसांकडे असून संपूर्ण चौकशीनंतरच यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल,  असे स्पष्ट केले होते.  तर  धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ होते. ते व्हिडिओ कॉलवरही शरीरसंबंधांची मागणी करायचे आणि त्यानंतर शरीरसंबंध ठेवत असल्याचे रेणू शर्माने म्हटले होते. तसेच तिने या केसेमधून  माघार घेत असल्याचेही म्हटले होते.