देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल : राष्ट्रवादी

0
133

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोत बसून फोटो काढला होता. तो फोटो ट्विट करत, मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल? असा खोचक सवाल करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.  यावर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी ट्विट करत फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्रजी, तुम्हाला लवकरच संधी मिळेल, असे म्हणत तपासे यांनी फडणवीस यांना उत्तर दिले आहे. मुंबई मेट्रो-३ हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल यात शंका नाही. परंतु केंद्राकडून वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे, अशी मुंबईकरांची भावना आहे. त्यामुळे केंद्रासोबत आपण जर संवाद साधला, तर प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकेल आणि तुम्हालाही मुंबई मेट्रो-३ मध्ये प्रवास करण्याची व फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळेल, असे तपासे यांनी म्हटले आहे.