देवेंद्र फडणवीस आज घेणार जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांची भेट

0
788

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज (रविवार) संध्याकाळी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते दोघे जिल्ह्यातील प्रमुख दोन दिग्गज नेत्यांची भेट घेणार आहेत. या भेटी खासगी स्वरूपाच्या असल्या तरी आगामी महापालिका, गोकुळ, केडीसी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.   

 

जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या आई सावित्रीबाई यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे फडणवीस वारणानगर येथे भेट घेऊन कोरे यांची सात्वंनपर भेट घेणार असल्याचे समजते. त्यानंतर ते इचलकरंजी येथे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची भेट घेऊन त्यांच्या पत्नी इंदुमती यांच्या निधनाबद्दल सांत्वन करतील. यावेळी ते भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, या भेटी खासगी स्वरूपाच्या असल्यातरी त्यामागे जिल्हयातील आगामी निवडणुकीची किनार आहे. भाजपला पाठिंबा देण्यासाठी या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.