कुरुंदवाड शहरातील विकासकामांना १५ दिवसांत सुरुवात : निखिल जाधव 

0
40

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरूंदवाड शहरातील विविध विकासकामांसाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. विकास कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामांची वर्क ऑर्डर काढून १५ दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.

जाधव म्हणाले की, अहिल्याबाई होळकर चौक ते लिंगायत समाज स्मशानभूमी रस्ता करणे, रिक्षा स्टॉप ते वैरण बाजार रस्ता डांबरीकरण करणे, राजवाडा चौक, चावडी चौक, काळाराम मंदिर ते जुना भैरववाडी पूल रस्ता डांबरीकरण करणे, भैरववाडी मोहिते घर ते भुजुगडे मळा रस्ता डांबरीकरण करणे, शेळके तालीम ६० फुटी रस्ता, सन्मित्र खानावळ ते राजू खराडे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, झारी मशिद, चव्हाण घर, अरविंद चव्हाण घर ते ४० फुटी रिंग रोड रस्ता कॉक्रीट करणे.

आत्तर गिरण, ६० फुटी रस्ता, पाखाली घर ते लठ्ठे घर रस्ता कॉक्रीट करणे, भैरवाडी जिन्नाप्पा चव्हाण घर, विरु गावडे घर, कर्नाळे घर ते बिरंजे घरापर्यंत रस्ता कॉक्रीट करणे, कुंभार गल्ली परिसर, यल्लम्मा मंदिर ते (गोठणपूर) परिसर रस्ता कॉक्रीट करणे, युनुस घोरी घर ते आलासे गोठा (४० फुटी रिंग रोड) रस्ता डांबरीकरण करणे, आदीसह कुरुंदवाड घाट रस्ता घाट परिसर सुशोभीकरण करण्यासाठी निविदा जाहीर केल्या आहेत. याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामांना सुरुवात करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.