कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर साळोखेनगर येथे आ. ऋतुराज पाटील यांच्या फंडातून पार्वती पार्क सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन आणि हडको कॉलनी येथे चॅनेल गटर्स कामांचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोनाच्या संकटामुळे मतदारसंघातील विकासकामांना निधी देता आला नाही. परंतु, आता प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी आ. पाटील यांनी दिली.

यावेळी माजी नगरसेविका प्रतीक्षा पाटील, धीरज पाटील, आनंद साजने, रमेश पाटील, डॉ सुधाकर ढेकळे, संतोष जाधव, राजेंद्र पत्की, बापू सरनाईक, अनिल घाटगे, नारायण ललित, अनिल केळुसकर आदी उपस्थित होते.