पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे,गणेश बिराजदार नागपूरचे नवे सहाय्यक पोलीस आयुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरच्या पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे आणि इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक उपअधीक्षक गणेश बिराजदार यांची नागपूर शहरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

राज्य सरकारने काल (बुधवार) रात्री उशिरा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने तीन पोलीस उपअधीक्षक यांची नेमणूक झाली आहे. यामध्ये रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांची गडहिंग्लजमध्ये तर हिंगोलीचे पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजने यांची जयसिंगपूरमध्ये. तसेचमुंबईत जात पडताळणी समितीच्या सुनिता नाशिककर यांची कोल्हापूर पोलीस मुख्यालयामध्ये बदली झाली आहे.

Live Marathi News

Recent Posts

‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहिमेचा कॅन्सरग्रस्तांना मदतीचा हात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वारणानगरमध्ये कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु…

7 hours ago