कोल्हापूर (प्रतिनिधी) :  ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांचे पार्थिव कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवले आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती सरोज पाटील उर्फ माई, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करुन अंत्यदर्शन घेतले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,  मनोहर शिंदे,  खासदार संजय मंडलिक, काकी शितल पाटील,  माजी खासदार राजू शेट्टी,  इतिहास संशोधक जयसिंगराव पवार आणि निपाणीचे आमदार काका पाटील, सरला पाटील, भारत पाटणकर यांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहली.

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनीही अंत्यदर्शन घेतले.

शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी लाल निशाण अर्पण करून आदरांजली वाहिली. कसबा बावडा येथील स्मशानभूमीत आज दुपारी साडेबारा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.