उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘या’ भेटीमुळे चर्चेला उधाण…

0
726

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापुरमध्ये आज (सोमवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यू पॅलेस येथे जाऊन श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट घेतली. यावेळी माजी आ. मालोजीराजे उपस्थितीत होते. या भेटीमुळे कोल्हापूरमध्ये चर्चेंना उधाण आले आहे.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी अचानक अजित पवार यांचा ताफा न्यू पॅलेसकडे वळला. अजित पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. तब्बल तासभर ही बैठक सुरू होती. यावेळी मराठा संघटनेचे काही नेते सुद्धा उपस्थितीत होते. खा. संभाजीराजे छत्रपती यांनी १६ तारखेला कोल्हापुरात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

अलीकडे खा. संभाजीराजे यांची आरक्षणाबाबत ठाम भूमिका, भाजपा पासूनचा दुरावा, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्यावर व्यक्त करीत असलेली नाराजी. खासदारकीचा संपत आलेला कार्यकाळ, या पार्श्ववभूमीवर राष्ट्रवादी खा. संभाजीराजे यांचेवर जाळे टाकत असल्याची चर्चा या भेटीच्या निमित्ताने आज कोल्हापुरात होती.