‘पुणे पदवीधर’साठी वंचित बहुजन आघाडीकडून सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी

0
129

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडी पक्षातून प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथे झालेल्या मेळाव्यात केली आहे. त्यामुळे तशी तयार पूर्ण झाली असून, वंचित बहुजन आघाडी पक्ष पूर्ण ताकदीने पुणे पदवीधर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आज (शनिवार) उमेदवार प्रा. सोमनाथ साळुंखे आणि जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील पदवीधरांची बेरोजगारी, उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या समस्या, शिष्यवृत्ती, उद्योगधंदे यासह पदवीधरांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही निवडणूक लढवत असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बूथ पर्यंत वंचित बहूजन आघाडी पोहचली असून सुमारे ३७ हजार नोंदणी झाल्याचे साळुंखे यांनी सांगितले. पदवीधरांच्या समस्या सोडवण्यात पदवीधर आमदार अयशस्वी ठरले असून, येणारा पुणे पदवीधर निवडणुकीचा निकाल बघून प्रस्थापितांना धक्का बसेल, असे ही साळुंखे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला प्रवक्ते डॉ. मिलिंद हिरवे, डॉ. आनंद गुरव, सचिव सचिन कांबळे, कृष्णा भारतीय, शहर अध्यक्ष संजय दुघे, महिला आघाडीच्या अस्मिता दिघे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.