यळगुडमध्ये डेंग्यू सदृश रुग्णांची वाढ : प्रशासनाचे दुर्लक्ष

0
37

रांगोळी (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील यळगुड गावात काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना ग्रामपंचायत व्यवस्थापन आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.

तर हुपरी, रेंदाळ गावांमधील काही भागात संशयित आढळून आले असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यळगुड गावातील सर्वच भागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून काही ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामध्ये डासांची उत्पत्ती वाढत आहे. तर यळगुड गावात आतापर्यंत एकूण १९ रुग्ण उपचार घेताना आढळून आले आहेत.

त्यांच्यावर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून १२ रुग्ण बरे होऊन घरी परत आले आहेत. तर साथ आटोक्यात येत असल्याचा दावा आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवकांनी केला आहे.