विविध मागण्यांसाठी ‘युनिव्हर्सिटी स्टुडंट्स’ची निदर्शने

0
75

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विविध मागण्यांसाठी युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशनच्या वतीने दसरा चौकातील राजर्षी छ. शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर आज (सोमवार)  जोरदार निदर्शने करण्यात आली.

राज्य शासनाने वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती १०० टक्के करण्यात यावी, सीएचबी प्राध्यापकांची निवड प्रक्रिया करून आर्थिक मदत करावी, पदवीधरांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करून त्यामाध्यमातून त्यांच्या कौशल्यानुसार व्यवसाय व रोजगारासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात याव्यात यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनात राज्याध्यक्ष प्रा. प्रकाश नाईक, जिल्हा अध्यक्ष प्रविण वाघमारे, उपाध्यक्ष सचिन घोसाळकर, अनिल मिसाळ, प्रा. निलेश घोलप यांच्यासह युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.