दिंडनेर्ली येथे उद्या शाहू कारखान्यातर्फे ऊसांवर ड्रोन तंत्राद्वारे फवारणीचे प्रात्याक्षिक

0
118

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथे छ. शाहू  कारखान्यातर्फे उद्या (शुक्रवारी) ऊस पिकांवर ड्रोन तंत्राद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. अशी माहिती शाहू कारखान्याच्या प्रशासनाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यावेळी अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शाहू कारखान्यामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाने ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी  नवनवीन प्रयोग राबविण्यात येत आहेत. यासाठी खते, औषधे, कीटकनाशके यांची फवारणी उपयुक्त आहे. मात्र, मोठ्या जमिनीतील ऊस पिकांच्या फवारणीमध्ये अडथळे येतात. यावर पर्याय म्हणून अत्याधुनिक  तंत्राद्वारे तयार केलेले ड्रोनद्वारे फवारणीचे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी दिंडनेर्ली येथे प्रात्याक्षिक घेणार असल्याचे सांगण्यात आले.