शिवाजी विद्यापीठासमोर नागरी कृती समितीची निदर्शने

0
204

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  लॉकडाऊन  काळात नागरिकांसह खेळाडूंना व्यायामासाठी बंद ठेवण्यात आलेला शिवाजी विद्यापीठ परिसर पुन्हा खुला करण्याच्या मागणीसाठी आज (मंगळवार) शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने विद्यापीठासमोर निदर्शने करण्यात आली. तर  याबाबत नवीन वर्षात कार्यवाही करण्याचे आश्वासन कुलसचिव विलास नांदवडेकर यांनी शिष्टमंडळाला दिले.

शिवाजी विद्यापीठ परिसरात शहरातील नागरिक आणि खेळाडू सकाळी व सायंकाळी व्यायाम,  फेरफटका मारण्यासाठी येतात.  मात्र, कोरोनामुळे विद्यापीठ परिसर बंद ठेवण्यात आला आहे. तर दोन महिन्यापूर्वी राज्य शासनाने क्रीडांगणे जीम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, विद्यापीठ परिसर खुला करण्यात आलेला नाही.  याबाबत कृती समितीच्या वतीने कुलगुरूंना निवेदन दिले होते. पण  याची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ निदर्शने केली.

या आंदोलनात अशोक पवार,  रमेश मोरे, चंद्रकांत पाटील,  यशवंत वाळवेकर, प्रवीण बनसोडे, नंदकुमार बामणे, प्रफुल्ल पाटील, सुनीलकुमार सरनाईक, डी.व्ही.रेडेकर, गौरीशंकर शिंगोळे,  महादेव पाटील,  फिरोज खान,  अंजुम देसाई, लहुजी शिंदे, अरुण पाटील, मोहन वाडकर, सुहास मिठारी आदीसह नागरी कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, खेळाडू सहभागी झाले होते.