कोल्हापुरात ओबीसी मोर्चातर्फे राज्यपालांच्या विरोधात निदर्शने

0
11

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल आज कोल्हापुरातील दसरा चौकात राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

दरम्यान भगतसिंग कोश्यारी यांना तत्काळ राज्यपाल पदावरून हटवावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अश मागण्याही करण्यात आल्या. आंदोलनात किरण कांबळे, महेश बावडेकर, प्रमोद हर्षवर्धन, राजू पाटील, प्रशांत हावळ यांच्या सह राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.