संत रोहिदास महाराजांची जयंती जांभळी ग्रामपंचायतीमध्ये साजरी करण्याची मागणी

0
134

शिरोळ (प्रतिनिधी) : चर्मकार समाजाचे आराध्यदैवत, गुरू संत रोहिदास महाराजांची जयंती २७ फेब्रुवारी रोजी आहे. मागील वर्षी महाराजांची जयंती जांभळी (ता. शिरोळ) ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली नव्हती. यंदा मात्र, ही जयंती साजरी झाली पाहिजे, अशी मागणी संत रोहिदास विकास फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष निशिकांत शिंदे यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

शिंदे यांनी सरपंच खंडू खिलारे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रोहिदास महाराजांची जयंती शासन परिपत्रकानुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करावी. गतवर्षी जांभळी ग्रामपंचायत कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली नव्हती.

सरपंच खिलारे यांनी उद्या सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांना दिले.