राष्ट्रीय विरोध दिन साजरा करण्याची मागणी : कर्मचारी संघटना

0
47

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार, कर्मचारी धोरणाविरोधात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे राष्ट्रीय विरोध दिन पाळावा, अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, कोरोना महामारीची ढाल पुढे करून सरकार कामगार, कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणत आहे. अनेक विभागातील रिक्त जागा न भरल्याने बेरोजगारीत भर पडली आहे. कामगार हक्कावर आक्रमण केले आहे. यापार्श्वभूमीवर २९ सप्टेंबर २०२० हा दिवस राष्ट्रीय विरोध दिन म्हणून पाळावा. खासगीकरण, कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करा, जबरदस्तीने सेवानिवृत्त करू नये, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यासेवा नियमित करावे, कोरोना योध्दाच्या मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना विनाविलंब भरीव आर्थिक मदत करावी, रिक्त पदे भरावे.

निवेदन देताना संघटनेचे सरचिटणीस अनिल लवेकर, वसंत डावरे, उदय लबोरे, महेश सावंत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here