‘गडहिंग्लज’ पंचायत समितीसाठी ‘नावीन्यपूर्ण’ निधीची मागणी

0
68

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजची पंचायत समिती नेहमीच यशवंत पंचायत राज अभियानामध्ये अग्रेसर आहे. तालुक्यामध्ये अनेक नावीन्यपूर्ण योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या जातात. नुकतीच प्रशासकीय इमारतीमध्ये यशवंतराव चव्हाण सन्मान दालन व अभ्यागत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. इतर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गडहिंग्लज पंचायत समितीला भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली आहे.

उपसभापती श्रिया कोणकेरी, सदस्या बनश्री चौगुले, विजय पाटील, विद्याधर गुरबे आदींनी पत्राद्वारे  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे ही मागणी केली आहे. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील उपस्थित होते.