सरसंघचालकांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक करण्याची मागणी

0
151

आजरा (प्रतिनिधी) : सरसंघचालक मोहन भागवत यांना जीवे मारण्याची तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर येथील मुख्य कार्यालय उडवून देण्याची जाहीर धमकी देणाऱ्या अरुण बनकर या इसमावर गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. आज (शुक्रवार) याबाबतचे निवेदन आजरा पोलिसांना देण्यात आले.  

आजरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना देण्यात भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संतोष बेलवाडे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, युवा मोर्चा उपाध्यक्ष उदयराज चव्हाण, शहराध्यक्ष वैभव नार्वेकर, उपाध्यक्ष विनोद जाधव, रामदास मिसाळ यांच्या सह्या आहेत.