गुणपत्रिकेवरील ‘नापास’ शब्द हटवला   

0
155

दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेसाठीचा ३० टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. बोर्डाने गुणपत्रिकेवरून ‘नापास’ हा शब्दही हटवला आहे. ऑनलाईन पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवरुन माहिती दिली होती.

ते म्हणाले की, बोर्डाने गुणपत्रिकेवरून ‘नापास’ हा शब्दही हटवला आहे. ऑनलाईन पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

दरम्यान, पोखरियाल यांनी सीबीएसईसह इतर बोर्डाच्या परीक्षाही कधी होणार, कशा घेतल्या जाणार, जेईई मेन्स आणि नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांचे शेड्यूल कसे असणार, या सर्व प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांमध्ये अनेक शंका आहेत. आतापर्यंत सीबीएसई परीक्षा २०२१ ची डेटशीट जारी करण्यात आलेली नाही. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत सर्व शंकांचे निरसन केले.