कातर : येथे सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकप २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर २०२२ रोजी होणार असून, अभिनेत्री दीपिका पदुकोण यावेळी फिफा वर्ल्डकप ट्रॉफीचे अनावरण करणार आहे. दीपिका ग्लोबल आयकॉन आहे आणि बॉलिवूडप्रमाणे हॉलीवूडमध्येही तिने काम केले आहे.

फिफा ट्रॉफी अनावरणाची जबाबदारी दीपिकावर सोपवली जाणे हा भारतीय कलाकाराला मिळालेला सन्मान असून, फिफाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे. दीपिका लवकरच कतारसाठी रवाना होणार असल्याचे समजते. फिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये भारतीय कलाकार नोरा फतेही हिने सुद्धा नृत्य केले आहे आणि त्याचे अनेक व्हिडीओ आले आहेत.