कोल्हापुर (प्रतिनिधी) : देशाच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या उद्योग व्यवसायामध्ये गोकुळ शिरगाव औद्योगिक महामंडळाचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच गोकुळ शिरगाव मॅनुफॅक्च्युरिंग असोशिएशनच्या अर्थात गोशिमाच्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. यंदाची गोशिमाची निवडणूक पार मोठ्या उत्साहात पडली. या निवडणुकीत गोशिमाच्या अध्यक्षपदी दीपक चौरगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

शांत, संयमी, व भविष्याचा वेध घेवून नवी दिशा देणारे दीपक चौरगे आपल्या कारकिर्दीमध्ये कौशल्यच्या जोरावर ‘गोशिमा’त एक वेगळा ठसा उमटवतील असा विश्वास कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी व्यक्त करीत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला.

या प्रसंगी सुनील दावणे, गजानन हवालदार, सुरेश पाटील, संजय चौगुले आदी उपस्थित होते. दीपक चौरगे यांच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.