दिल्ली हिंसाचारातील मुख्य सूत्रधार दीप सिद्धूला अटक

0
67

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फरार असणारा आणि २६ जानेवारीरोजी झालेल्या दिल्ली हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार दीप सिद्धू याला दिल्ली पोलिसांनी आज (मंगळवार) अटक केली. दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूच्यावर एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. लाल किल्ल्यावर झेंडा फडकविणे, आणि शेतकऱ्यांना भडकविणे असा आरोप  दीप सिद्धू याच्यावर ठेवण्यात आला आहे.   

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दीप सिद्धूला अटक केली आहे. मुख्य आरोपी दीप सिद्धू २६ जानेवारीपासून फरार होता. मात्र, लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारे गँगस्टर लक्खा सिधाना आणि जुगराज अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या सुमारे ५०  जणांचे फोटो प्रसिध्द केले आहेत. धार्मिक झेंडा फडकवणे आणि लाल किल्ल्यावर हिंसाचार केल्याप्रकरणी देशद्रोह आणि युएपीए अंतर्गत दीपवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार झाला होत. यावेळी  आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश करून  ध्वजस्तंभावर धार्मिक ध्वज फडकवला होता.