सरवडे (प्रतिनिधी) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या  रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, संचालक राजेंद्र पाटील, तालुका आरोग्य अधिकारी आर. आर. शेट्ये,  गटविकास  अधिकारी संदीप भंडारी आदी उपस्थित होते.

राज्यातील राष्ट्रीय मानांकन मिळवणारे राज्यातील पहिले आरोग्य केंद्र म्हणून सरवडे केंद्राची ओळख आहे. या केंद्रातर्गत ७ उपकेद्रांचा समावेश असून या  केंद्राने ‘कायापलट योजने’च्या माध्यमातून लोकसहभागातून संपूर्ण आरोग्य केंद्राचे रुप बदलून आरोग्यदायी सेवा देणारे केंद्र म्हणून ओळख निर्माण केली आहे. यामुळे या केंद्रामध्ये उपचार घेण्यासाठी दिवसेंदिवस रूग्णाची संख्या वाढत आहे. यामुळे या केंद्राला रुग्णवाहिकेची आवश्यकता होती.  ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून ही रुग्णवाहिका मिळाल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य आर.के. मोरे यांनी दिली.

यावेळी जि.प.सदस्य शिवाजी चौगले,  उपसभापती मोहन पाटील,  पंचायत समिती सदस्या कल्पनाताई मोरे,  शिवानी पाटील, वैद्यकीय अधिकारी स्वप्निल माळवदे, सरपंच दिग्विजय मोरे, उपसरपंच शशीकला मोरे  आदीसह   ग्रामपंचायत सदस्य, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य, सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.  तुकाराम कुंभार यांनी सूत्रसंचालन तर वैद्यकीय अधिकारी एस.एस.माळवदे यांनी आभार मानले.