पिंपळगाव (प्रतिनिधी) : पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास उपलब्ध झालेली नवीन रुग्णवाहिका परिसरातील डोंगराळ वाड्यावस्त्यातील रूग्णांच्या सोयीसाठी महत्वाचा दुवा ठरणार आहे, असे प्रतिपादन जि.प. सदस्या रोहिणी आबिटकर यांनी केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगावसाठी रोहिणी आबिटकर यांच्या प्रयत्नातून नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण कार्यक्रम  मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

माजी जि. प. सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले की, पिंपळगाव परिसरातील नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन रुग्णवाहिकेमुळे वाड्यावस्त्यावर तत्काळ आरोग्यसेवा देण्यास मदत होणार आहे.

प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत परूळेकर यांनी केले. यावेळी सरपंच श्रीधर भोईटे, योगेश परूळेकर, शिवाजी पाटील, अवघडी शालबिद्रे, दिगंबर देसाई, सुनिल किरोळकर, सागर मिसाळ, विलास पोवार, आनंदराव शेवाळे, दिलीप कदम, राजाराम भारमल, किरण गुरव, उत्तम धावडे, बबन निळपणकर, रमेश पाटील, रघुनाथ बोटे, तानाजी पाटील, जयवंत पाटील, हिंदुराव थोरवत, मनोहर नलगे, उदय मिसाळ, अनिल आरबुने, दयानंद ऱ्हाटवळ, भिमराव रेडेकर, ग्रामसेवक आर. जी. बोडके, आरोग्य सेवक बी. डी. पोवार, संदीप पाटील, आनंदा भोसले, सुभाष गवस, मारूती दुधाळे आदी उपस्थित होते. आभार आरोग्यसेवक सुरेश सुतार यांनी मानले.