कोल्हापूर ( प्रतिनिधी )  : राज्यात फेन्सिंग (तलवारबाजी) खेळाला चालना मिळावी. या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी राज्यातील खेळाडूंना उपलब्ध व्हावी,  यासाठी राज्यातील ५ जिल्ह्यात फेन्सिंग (तलवारबाजी) साठी डेडिकेटीव्ह हॉल निर्माण करण्यात येणार आहेत. या हॉलसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून व महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देला जाईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी  दिली. ते  ३२ व्या राज्यस्तरीय वरिष्ठगट फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत   होते.

महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन,  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर,  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ व्या राज्यस्तर वरिष्ठगट फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात छत्रपती शाहू महाराज व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, डी. वाय. पाटील अभिमत विद्याठिाचे कुलगुरु डॉ. राकेशकुमार मुदगल, शिवाजी विद्यापिठाचे प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील,  डी. वाय. पाटील अभिमत विद्याठिाचे प्र-कुलगुरु डॉ. शिंपा शर्मा, क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, महाराष्ट्र  फेन्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रकाश काटोळे, फेन्सिंग असोसिएशनचे सचिव उदय डोंगरे, फेन्सिंग असोसिएशनचे सल्लागार अशोक दुधारे, फेन्सिंग असोसिएशनचे खजिनदार राजकुमार सोमवंशी, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संजय जाधव, कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशनचे सचिव विनय जाधव यांच्यासह फेन्सिंग मार्गदर्शक, रेफरी व खेळाडू उपस्थित होते.