कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये मतदार यादीचे नूतनीकरण करण्यात आली असून हरकतीसाठी ती जनतेपुढे ठेवण्यात आली आहे. परंतु, या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. तसेच हरकतीसाठी मुदत कमी ठेवण्यात आली आहे. याचा विचार करून हरकती देण्यासाठी मुदत वाढवून मिळावी. अशी मागणी राष्ट्रवादीने उपायुक्त रविकांत आडसूळ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आडसूळ यांनी निवडणूक निर्वीघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, आदिल फरास, सचिन पाटील, विनायक फाळके, प्रकाश गवंडी, रमेश पोवार, अनिल घाटगे, सुनील देसाई, फिरोज सरगुर, नागेश जाधव आदी उपस्थित होते.