वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला आव्हान देण्याचा मुलगीला अधिकार : हायकोर्ट

0
89

मुंबई (प्रतिनिधी) : वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. विवाह झालेल्या पती आणि पत्नीलाच दुसऱ्या विवाह परवानगीला आव्हान देण्याचा अधिकार असतो,  असा एका महिलेने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर कुटुंब न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आर. डी. धनुका आणि न्यायाधीश बिश्ट यांच्या खंडपीठाने म्हटले आहे  की, पती आणि पत्नीलाच विवाह परवानगीला आव्हान देण्याचा अधिकार चुकीचा आहे. तर वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या परवानगीला मुलगीलाही न्यायालयात आव्हान देण्याचा अधिकार आहे.  

मुंबईतील तक्रारदार महिलेने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझ्या वडिलांनी २००३  साली दुसरा विवाह केला. २०१६ मध्ये वडिलांचे निधन झाल्यावर माझ्या सावत्र आईला वडिलांच्या पहिल्या लग्नाविषयी समजले. पण तिचाही पूर्वी एका पुरुषाशी विवाह झाला होता. तसेच पहिल्या नवऱ्यासोबतची घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याआधीच तिने दुसरे लग्न केल होते. या सगळ्या परिस्थितीमुळे मी वडिलांच्या विवाह वैधतेला कुटुंब न्यायालयात आव्हान दिले. यावर  विवाहाच्या वैधतेला आव्हान देण्याचा अधिकार फक्त नवरा बायकोलाच असतो. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला नसतो,  असा युक्तीवाद तक्रारदार महिलेच्या सावत्र आईने केला. मात्र, तक्रारदार महिलेने घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याआधीच सावत्र आईने दुसरा विवाह केला होता. असे मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मुलगीलाही वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला आव्हान देण्याचा अधिकार आहे, असा  निकाल दिला.