शिवसेनेचे नेते वामनराव महाडिक यांची कन्या शिंदे गटात

0
35

मुंबई (प्रतिनिधी) :  शिवसेनेतील पहिले आमदार म्हणून ज्यांची नोंद आहे ते वामनराव महाडिक यांची कन्या हेमांगी महाडिक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हेमांगी महाडिक यांचा प्रवेश झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांनी आम्ही पुढे जात आहेत. यामुळेच सगळे लोक आमच्यासोबत येत आहेत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कॉ. कृष्णा देसाई हे परळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. १९७० च्या जूनमध्ये देसाईंची हत्या झाली आणि त्याच वर्षी म्हणजे १८ ऑक्टोबर १९७० रोजी परळच्या जागी पोटनिवडणूक जाहीर झाली आणि या पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक यांना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली. महाडिक यांनी ही निवडणूक जिंकली आणि ते शिवसेनेचे पहिले आमदार बनले, एवढचे नाही तर पहिले खासदार होण्याचा मानही त्यांनीच मिळवला आहे.

निष्ठावान म्हणून राहिलेले आणि शिवसेनेचे पहिले आमदार व खासदार म्हणून निवडून आलेले वामनराव महाडिक यांची कन्याच आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात दाखल झाल्याने हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.