अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी सायंकाळी संपला, पण गुजरात विधानसभा निवडणुकीचा विषय आला की रवींद्र जडेजाच्या कुटुंबाचे नाव समोर येत आहे. क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या घरी सध्या कौटुंबिक युद्ध सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, तर दुसरीकडे त्याची बहीण काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार करत आहे. एवढेच नव्हे तर तिच्या बहिणीकडून जडेजाची पत्नी रिवाबा हिच्यावर आरोप देखील, तिच्या विरोधात तक्रारदेखील त्याच्या बहिणीने केली; पण आता खुद्द जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंग यांनी लोकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

अनिरुद्ध सिंग जडेजा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत होता. या व्हिडिओमध्ये रवींद्र जडेजाचे वडील जामनगर उत्तर मतदारसंघातील लोकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. कारण जामनगर उत्तरमधून रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. अशा परिस्थितीत सुनेच्या विरोधात मतांचे आवाहन करणारा हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.