कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र दत्त जयंती उत्सव रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. आता गगनबावडा तालुक्यातील गगनगडावर सालाबादप्रमाणे उद्या होणारी दत्त जयंती उत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती गगनबावडा तहसिलदार डॉ. संगमेश कोडे यांनी आज (सोमवार) पत्रकाव्दारे दिली आहे.