नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे उद्योग-धंद्यांसह विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आणि अभ्यासाचे संपूर्ण चक्रच बदलले आहे. त्यामुळे यंदा जेईई परीक्षा ४ वेळा होणार आहे. जेईई मेन परीक्षेचा संभ्रम संपला असून आता परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नियमित ऑनलाईन पत्रकार परिषदेत परीक्षेच्या तारखांची घोषणा केली.

जेईई मेन परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी १६ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. यासंदर्भात NTA ने जेईई मेन परीक्षा २०२१ ची अधिकृत अधिसूचना jeemain.nta.nic.in वेबसाइटवर देखील जाहीर केली आहे. एप्रिल महिन्यात २७, २८, २९ आणि ३० तर मे महिन्यात २४, २५, २६, २७, २८ तारखांना परीक्षा होणार आहे.

जेईई मेन परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nic.in वर भेट देऊन ‘JEE मेन एप्रिल २०२१ साठी अर्ज करा’ वर क्लिक करा. त्यानंतर लॉगिन करा. आणि नोंदणी करावी. पुढे अर्ज करण्यासाठी फ्रेश यूजरवर क्लिक करा. फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व आवश्यक माहिती भरा. त्यानंतर फोटो स्कॅन करुन अपलोड करा. अर्ज फी देखील भरावी लागेल. यानंतर नोंदणी क्रमांक सुरक्षित ठेवा.