Published October 23, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सकल मराठा समाजाच्या वतीने दसऱ्याच्या दिवशी सकल मराठा बँनरचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच सकल मराठा दसरा मेळावा होणार असल्याचे सकल मराठा शौर्य पिठाचे अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रसाद जाधव यांनी आज (शुक्रवार) शिवाजी मंदिरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

काही महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने स्थगिती देऊन मराठा आरक्षण प्रश्न हा घटनापीठाकडे वर्ग केला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातभर अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे उग्र आंदोलनास सुरवात झाली.  या लढ्याला व्यापक स्वरूप यावे म्हणून दसऱ्याच्या दिवशीच म्हणजे रविवारी (दि.२५)  सकाळी अकरा वाजता शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक, कोल्हापूर येथे छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जाईल. त्यांनतर छ. शिवाजी महाराज्यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यासमोर श्रीफळ वाढवून शिवाजी मंदिर येथे  रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी समस्त मराठा बांधव आणि विविध जाती धर्माचे लोक सहभागी होणार आहेत. त्यानंतर खासदार छ. संभाजीराजे  शिवाजी मंदिर येथे मार्गदर्शन करतील.

त्यानंतर शिवाजी मंदिरात शहरातील डॉक्टर्स, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, वकील, प्राध्यापक, विद्यार्थी, मराठा समाज व्यापारी यांचा मराठा समाज आरक्षणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी परिषदा भरविल्या जाणार असल्याचे सांगितले. यावेळी सुजित चव्हाण, महेश जाधव, रविकिरण इंगवले, सचिन चव्हाण, प्रकाश सरनाईक आदी उपस्थित होते.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023