टोप संभापुर येथील चिन्मय गणाधिश गंधर्व येथे गव्याचे दर्शन…

0
1153

टोप (प्रतिनिधी) : गेले अनेक दिवस सादळे-मादळे, कासारवाडी परिसरात वावरणारा गवा आज (रविवार) सकाळी टोप संभापुर येथील चिन्मय गणाधीश गंधर्व येथे आला. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्यात भितीची वातावरण पसतले आहे. तर विनविभागाकडून या गव्याला सायंकाळनंतर मोहिम राबवून त्याला बाहेर त्याच्या आधीवासात सोडले जाणार असल्याचे सांगितले.

आज विनायक चतृथी असल्याने श्री चिन्मय गणेशाच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होत असते तसेच गंधर्व रिसोर्टमध्येही मोठ्याप्रमाणात गर्दी असते यामुळे यापरिसरात मोठी गर्दी पहावयास मिळत होती. याबाबतची माहिती मिळतात शिरोली पोलिस स्टेशनचे अधिकारी तसेच डब्लुएलपीआरएस रेस्क्यू टीम तात्काळ दाखल झाले.

यावेळी आर. एस. कांबळे, वनविभाग हातकणंगलेचे साताप्पा जाधव, करवीर वनपाल विजय पाटील, कृष्णात दळवी, पुंडलीक खाडे, रेस्क्यूमधील देवेंद्र भोसले, तेजस जाधव, अमोल चव्हाण, राकेश शिक्रे सचिन निकम उपस्थित आहेत.