कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज (मंगळवार) विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. तत्पूर्वी त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.

भागवत यांनी विधिवत पूजा करत करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.  यावेळी मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, भागवत यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. तर आज सायंकाळी कणेरी मठावर आयोजित कार्यक्रमासाठी ते हजेरी लावणार आहेत.